भारताचे सर न्यायधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दौंडमध्ये तीव्र निषेध मोर्चा.
सर्व दलित संघटना एकत्र येत अधिकार्यांना दिले निवेदन.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – भारताचे सर न्यायधीश भूषण गवई यांच्यावरील सुप्रीम कोर्टात एका सुनावणी दरम्यान अतिशय निंदनीय प्रकार घडला आहे. राकेश किशोर असे बूट फेकणाऱ्या वकीलाचे नाव समोर आले आहे या वकीलाने सर न्यायधीश यांचे दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर ” सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” अशी घोषणा सुद्धा दिली. या प्रकारामुळे सर्वच दलित संघटना यांनी एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी सर्व संबधित अधिकाऱ्यांना दिले.
सर न्यायधीश भूषण गवई याचे खंडपिठा समोर सुनावणी सुरु असताना ह्या वकिलाने गवई यांचे दिशेने बूट फेकला. यावेळी न्यायालयात असलेल्या सुरक्षा कर्मचारी यांनी हा हल्ला रोकला व या वकिलाला न्यायालयाच्या आवारातून तातडीने बाहेर काढले. बाहेर नेताना हा राकेश किशोर वकील ” सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” अशी घोषणा देत होता. असे उपस्थित वकिलांनी नमूद केले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया ने त्वरित दखल घेत तातडीने कारवाई करीत हा वकील राकेश किशोर याची सनद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. बार संघटना आणि सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दौंड शहरातील सर्वच दलित संघटनानी या बूट फेकन्याच्या प्रकारांचा तीव्र निषेध व्यक्त करीत हा प्रकार न्याय पालिकेतील सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट होते हे संविधान विरोधी असल्याचे म्हटले आहे. या वकील्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राजु गायकवाड,अमीत सोनवणे -RPI (कवाडे), श्रीकांत शिंदे,भगवान शिंदे,भारत सरोदे, भिमराव मोरे,आरिफ शेख,गायकवाड , व्ही एस,आर एन त्रिभुवन, N.Dimagar. तसेच सर्वच दलित संघटनाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.