प्रताप कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची नामांकित संस्थांमध्ये निवड — संगणकशास्त्र विभागाचा अभिमान.
अमळनेर : विक्की जाधव.
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑफ-कॅम्पस भरती मोहिमेत या विभागातील तीन विद्यार्थ्यांनी विविध प्रतिष्ठित पदांसाठी निवड मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

कु. हेमंत दिपक गायकवाड यांची Wipro कंपनीत Scholar Trainee म्हणून निवड झाली असून, त्याला BITS, पिलानी या नामांकित संस्थेतून M.Tech पदवी मिळविण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. कु. प्रेम भगवान साळुंखे याची Amazon मध्ये Data Analyzer पदासाठी निवड झाली आहे. तर कु. रोहन प्रमोद पाटील याची भारतीय नौदलात (Indian Navy) निवड झाल्याने महाविद्यालयाच्या गौरवात भर पडली आहे.विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांनी अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले. “सातत्यपूर्ण परिश्रम, तांत्रिक कौशल्य आणि मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले,” असे मत व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.