शिरपूर: 04/03/2022 रोजी दक्षता सेवा फाऊंडेशन ची पहिली मिटींग… शिरपुर जि.धुळे.. येथे निमझरी नाक्यावर गणपती मंदिराच्या कार्यालयात.. संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.संजय भावसार सर व संचालक मंडळाचे वरीष्ठ सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने झाली…. मिटींग मध्ये दक्षता सेवा फाऊंडेशन चे वरीष्ठ पदाधिकारी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख… माननीय श्री.के.एस.पाटील सर हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.
प्रमुख अतिथी यांनी संघटनेचे कार्य,उद्दीष्ट सांगुन सर्वांचे अतिशय उत्कृष्ट पणे मार्गदर्शन केले… व 8 मार्च जागतिक महिलादिना चे औचित्य साधून महिला पोलिस कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी पोलिस स्टेशन च्या आवारात साजरा करण्याचे आयोजित केले… आज च्या मिटींग ला.. तालुका उपाध्यक्ष विजय सर भालेराव.. तालुका सचिव प्रविण सर मराठे.. तालुका प्रसिद्धी प्रमुख सुनिल सर सुर्यवंशी, तालुका संघटक श्रीकृष्ण सर शर्मा, महिला तालुका अध्यक्ष मंजुषाताई परदेशी, शहर अध्यक्ष सीमाताई विसपुते, तालुका सचिव दिपालीताई राजपुत, शहर सचिव मायाताई पावरा, तालुका खजिनदार चैतालीताई पाटील, शहर खजिनदार मंगलाताई शिरसाठ हे उपस्थित होते.