June 30, 2025 4:44 pm

शिवजयंती निमित्त जेऊर येथे प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान – युवानेते पृथ्वीराज पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- शिवजयंती निमित्त मंगळवारी जेऊर येथे प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती देताना पाटील यांनी सांगितले की दरवर्षी प्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने जेऊर ता करमाळा येथे मंगळवार दिनांक 8 मार्च रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील नामांकित शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी ठिक ७ वाजता सुरु होणार असून त्या अगोदर ठिक सायंकाळी ५ ते ७ वाजलेच्या दरम्यान शिवशाहीर सम्राट डाॅ देवानंद माळी (सांगली) हे छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर पोवाडा सादर करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम येत्या मंगळवारी जेऊर येथील बाजारतळाचे भव्यपटांगणावर होणार आहेत. माजी आमदार नारायण(आबा) पाटील यांच्यासह पाटील गटातील व शिवसेनेतीले पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य तसेच जेऊर ग्रामपंचायत व मा आ नारायण पाटील मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तरी या कार्यक्रमासाठी करमाळा तसेच माढा तालुक्यातील शिवप्रेमींनी उपस्थित राहुन शिव व्याख्यान व शिवचरित्र पोवाडा या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!