मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC प्रक्रिया सुरू

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC प्रक्रिया सुरू

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : मुंबई

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी आता e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दिला जाणारा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की, सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. या कालावधीत e-KYC न केल्यास योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या वितरणात अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारने यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशी सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन किंवा अधिकृत संकेतस्थळावरून लाभार्थिनी आपली माहिती पडताळून घेऊ शकतात. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती देणाऱ्या या योजनेतील पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी e-KYC हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!