अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अमळनेर नगरपरिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया व वीज महामंडळाला भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अमळनेर नगरपरिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया व वीज महामंडळाला भेट

 

अमळनेर : विक्की जाधव.

आखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे शासकीय भेट प्रकल्प अंतर्गत अमळनेर नगर परिषद मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांना भारतीय संविधानाची फोटोफ्रेम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले . या प्रसंगी त्यांच्याशी अमळनेर शहरातील नागरिकांच्या विविध प्रभागांतील उद्भवभवणाऱ्या मूलभूत पाणी ,रस्ते आदि समस्यांचे व लोक वर्गणी कमी करणे बाबत चर्चा करण्यात आली तेव्हा श्री नेरकर साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला .तसेच श्री मुख्याधिकारी यांनी केलेल्या चांगल्या कामांचे अ.भा.पंचायत अमळनेर तर्फे अभिनंदन देखील करण्यात आले . याप्रसंगी मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्या ॲड सौ भारती अग्रवाल , जिल्हा ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक श्री एस डी देशमुख सर , जिल्हा सहसचिव श्री मकसूदभाई बोहरी , कोषाध्यक्ष सौ कपिलाताई मुठे , तालुका अध्यक्षा सौ स्मिताताई चंद्रात्रे , तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी जिल्हा बँक व सायबर क्राईम प्रमुख श्री विजय शुक्ल , जिल्हा ऊर्जा प्रमुख श्री सुनिल वाघ , खजिनदार सौ वनश्री अमृतकार , सौ अलका गोसावी , श्री दिगंबर गोसावी तसेच माजी नगरसेवक श्री पंकज चौधरी , श्री बाळासाहेब संदानशिव यांची उपस्थिती होती.

दुसऱ्या भेटीत नव्याने रुजू झालेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक श्रीमती सोनाली घोडेस्वार यांच्या अ.भा.ग्राहक पंचायत तर्फे अध्यक्ष सौ स्मिता चंद्रात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्यात. ग्राहकांच्या विविध समस्यांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली व व्यवस्थापक श्रीमती घोडेस्वार मॅडम यांनी ते आपण सर्व समस्या सोडविण्यास कटीबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

तिसऱ्या सत्रात वीज महामंडळ चे उप कार्यकारी अभियंता श्री नेमाडे साहेब यांची भेट घेण्यात आली याप्रसंगी वीज मीटर जेव्हा बदलण्यात येते तेव्हा कॉन्ट्रॅक्टर हे त्याची नोंद वेळेवर करत नसल्याने ग्राहकांना अवाजवी बिल द्यावे लागत आहे. ते नियमित केल्यास ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही अशी विनंती वजा सूचना अ.भा.ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे श्री नेमाडे साहेबांना करण्यात आली व त्यांनी आश्वासन दिले की सदर तक्रारींचे आम्ही लवकरच निराकरण करू असे आश्वासन त्यांनी दिले अशी माहिती पंचायतीच्या पी आर ओ सौ मेहराज बोहरी कळवितात. I

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!