देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आंबाऋषी टेकडी गुप सदस्यांनी लावले ७५ वृक्ष
अमळनेर : विक्की जाधव.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथील आंबाऋषी टेकडी परिसरात गुप सदस्यांनी ७५ वृक्षारोपण करून अनोखी भेट दिली. पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासह मोदींच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्याचा हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या वृक्षारोपणात विविध फळझाडे, औषधी झाडे आणि सावलीदार वृक्षांचा समावेश करण्यात आला असून पुढील पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प गुप सदस्यांनी यावेळी केला. “पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा”
या उपक्रमाला स्थानिक नागरिक, तरुणाई व सामाजिक संस्थां टेकडी ग्रुप चा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोदींनी घेतलेल्या स्वच्छता, जलसंवर्धन व पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमांना सलाम करत गुप सदस्यांनी वृक्ष संवर्धनाचे व्रत हाती घेतले. या उपक्रमामुळे आंबाऋषी टेकडी हरितद्रष्टा संकल्पाचे प्रतीक म्हणून उजळून निघाली आहे.