नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त डि.आर. कन्या शाळेत निबंध व चित्रकला स्पर्धा
अमळनेर : विक्की जाधव.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती द्रौपदीराम कन्या शाळेत निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल 500 हून अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर भारत, विकसित भारत, चिनाब नदीवरील पूल, मोदींचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदा, नरेंद्र मोदी यांचे व्यक्तीचित्र तसेच स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित आकर्षक पोस्टर्स अशा विविध विषयांवर कल्पकता व्यक्त केली. निबंध स्पर्धेतही विद्यार्थिनींनी आपल्या विचारांची ओघवती मांडणी करून वातावरण भारावून टाकले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे चेअरमन निरज अग्रवाल, मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका एस.पी. बाविस्कर, पर्यवेक्षक एस.पी. वाघ, तसेच शिक्षक प्रतिनिधी डी.एन. पालवे, एस.एस. माळी, के.आर. बाविस्कर, एस.एस. देवरे, आर.एस.सोनवणे, निबंध स्पर्धा प्रमुख एल.व्ही. घ्यार व जे.पी. टूले, बी. एस. पाटील, ज्येष्ठ लिपिक श्याम पवार यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित यांनी सहकार्य केले.विशेष म्हणजे, विद्यार्थिनींबरोबरच शिक्षक-शिक्षिकांनीही नरेंद्र मोदी यांचे चित्र रंगवून स्पर्धेला वेगळे स्वरूप दिले. या कार्यक्रमामुळे शाळेत सर्जनशीलतेचे, राष्ट्रभक्तीचे आणि व्यक्तिमत्व विकासाचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले.