प्रशासनाच्या बँजो निर्बंधावर गणेशोत्सव मंडळे आक्रमक

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी:- करमाळा पोलीस प्रशासनाने शांतता कमिटीच्या बैठकीत तालुक्यासह शहरातील सर्व गणेश मंडळांना निमंत्रीत केले होते. सदर बैठकीत डॉल्बी वाजवण्यावर निर्बंध घालण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी मंडळांना दिले होते. सदर निर्णयाचे स्वागत करीत अनेक गणेश मंडळानी डॉल्बी चालकाना दिलेली रक्कम परत करण्यास विनंती केली असता डॉल्बी मालकानी रक्कम परत दिली नाही. त्या पार्श्वभूमीवर मंडळानी डॉल्बी मालकाना दिलेला अडव्हांस बुडीत धरत डॉल्बी रद्द केले व पोलिस प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार पारंपारिक बँजो लावण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगारी लावून बँजोची शोधाशोध सुरू केली. ऐन वेळी बँजो मिळत नसल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली होती. त्यामध्येही अथक परिश्रम घेत मंडळानी पोलिसांच्या आवाहनानुसार बँजो पथक ठरवून त्याला जवळपास ९०% रक्कम अदा केली आहे.
परंतु अचानक पोलीस प्रशासनाने बँजोवर सुद्धा निर्बंध लावले असल्याचे सांगताच मंडळाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला व दहा मिनिटातच करमाळा शहरातील सर्व मंडळे किल्ला वेस येथे एकत्र येत पोलीस प्रशासनाच्या बँजोच्या निर्बंध धोरणाविरोधात एकवटले व सर्वांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. त्यामुळे शहरात काल दिवसभर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी विविध संघटनेतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहून दूरध्वनीवर पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करत बँजोवरील निर्बंध उठवण्यात यावेत अशी मागणी करीत होते. परंतु बँजो च्या नावाखाली काही मंडळे डॉल्बीचे साउंड लावतात त्यामुळे बँजोवर बंदी घालत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनाशी बोलताना कार्यकर्ते म्हणाले की, आज पर्यंत करमाळा शहरात शांततामय पद्धतीने मिरवणुका निघाल्या आहेत. कोठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेत मंडळानी पोलीस प्रशासनास सहकार्य केले आहे. इथून पुढेही प्रशासनाच्या आवाजाच्या मर्यादेत मिरवणुका काढल्या जातील. परंतु नाहक निर्बंध लावून मंडळांना त्रास देऊ नये अशी भावनाही यावेळी मंडळाच्या वतीने अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. तसेच बँजोवरील निर्बंध न उठवल्यास तहसील कार्यालयाच्या आवारात गणपती ठेवण्यात येईल असा निर्णय यावेळी गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!