प्रताप चा निर्भय सोनार व जयेश सोनार या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भरारी – SET परीक्षेत यशस्वी कामगिरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप चा निर्भय सोनार व जयेश सोनार या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भरारी – SET परीक्षेत यशस्वी कामगिरी..

 

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार व जयेश संजय सोनार यांनी सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली SET पात्रता परीक्षा उत्तीर्ण करत अमळनेर शहराचा मान उंचावला आहे. शिक्षण क्षेत्रातील या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.

निर्भय सोनार हे ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांचे कनिष्ठ चिरंजीव असून, ऍड. सारांश सोनार यांचे धाकटे बंधू आहेत. तर जयेश सोनार यांनी यापूर्वीच दोनदा NET परीक्षा उत्तीर्ण करून आपली शैक्षणिक जिद्द सिद्ध केली होती. सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासू वृत्ती आणि मार्गदर्शकांचे सहकार्य या बळावर दोघांनीही आज मोठी शैक्षणिक झेप घेतली आहे.

या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन, उपप्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, विभाग प्रमुख डॉ. विजय तुंटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथपाल आणि सहकारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या यशामुळे प्रताप महाविद्यालयाचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल झाले असून, दोघांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!