नगरपरिषदेच्या ढोंगी आश्वासनांची पोलखोल – राजे संभाजी मित्र मंडळाचा गांधीगीरीतून निषेध!

अपनी भाषा में पढ़े! Translate

नगरपरिषदेच्या ढोंगी आश्वासनांची पोलखोल – राजे संभाजी मित्र मंडळाचा गांधीगीरीतून निषेध

 

अमळनेर : विक्की जाधव.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून दररोज सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई केली जाईल, अशी गाजावाजा करून घोषणा करण्यात आली होती. मात्र वास्तव अगदी उलट! शहराच्या मध्यवर्ती भागात, सर्वाधिक गणेशभक्तांची वर्दळ असणाऱ्या राजे संभाजी मित्र मंडळाजवळील सार्वजनिक मुतारीत प्रचंड अस्वच्छता असून भक्तांना नाक दाबून जावे लागत आहे. आरोग्य विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन गंमत बघत असल्याचा आरोप नागरिक व मंडळ सदस्यांनी केला आहे.

आरोग्य निरीक्षकांपर्यंत तक्रार पोहोचवली तरी “अमळनेरकरांच्या नावाने खडे फोडा” अशा बिनडोक प्रतिसादामुळे मंडळ सदस्य हैराण झाले. नगरपरिषदेच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. गणेशभक्तांना यातून अक्षरशः त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते. यावर शेवटी राजे संभाजी मित्र मंडळाने गांधीगीरीची वाट निवडली. मंडळाने स्वतःच्या खर्चाने मुतारी स्वच्छ करण्यासोबतच दुर्गंधी प्रतिबंधक फवारणी सुरू केली आहे. तसेच ठळक फलक लावून गणेशभक्तांची माफी मागण्यात आली आहे. जनतेसाठी नगरपरिषद झोपेत असली तरी मंडळ जागे आहे, हे दाखवून मंडळाने सामाजिक बांधिलकीची वेगळी पातळी गाठली आहे. 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!