अमळनेरमध्ये तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न..

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक २५ ऑगस्ट रोजी शालेय शासकीय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका क्रीडा आयोजन समिती व ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, संस्थाध्यक्ष प्रा. बापूसाहेब शाम पाटील, प्राचार्य डॉ. निरज चव्हाण तसेच क्रीडा संयोजक एस.पी. वाघ उपस्थित होते.

स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील एकूण १९ संघांनी सहभाग घेतला. खेळाडूंनी चुरशीच्या लढतीत आपले कौशल्य दाखवत प्रेक्षकांची दाद मिळवली. निकालांमध्ये १४ वर्षे मुलांच्या गटात एस.एस. पाटील मा. विद्या. लोढवे विजयी ठरले, तर उपविजेते श्री एन.टी. मुंदडा ग्लोबल स्कूल अमळनेर ठरले. १७ वर्षे मुलांच्या गटात साने गुरुजी विद्यालय अमळनेरने विजेतेपद पटकावले, तर उपविजेते पुन्हा श्री एन.टी. मुंदडा ग्लोबल स्कूल ठरले. १९ वर्षे मुलांच्या गटात प्रताप कॉलेज अमळनेरने विजय मिळवला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच व गुणलेखकांनी मोलाचे योगदान दिले. विजयी संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेत अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन एस.पी. वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन केदार देशमुख यांनी मानले. स्पर्धेतून तालुक्यातील खेळाडूंच्या क्रीडागुणांना उत्तम व्यासपीठ मिळाले असून, जिल्हास्तरीय पातळीवरही ते यश मिळवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!