द्रौ.रा.कन्या शाळेत विद्यार्थिनींनी बनविले शाळु मातीचे गणपती
अमळनेर : विक्की जाधव
श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत अमळनेर नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शाडू मातीचे गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नगरपरिषदेच्यावतीने शाडू मातीचे वाटप करण्यात आले. शाळेचे कलाशिक्षक डी.एन.पालवे व एस.एस. माळी यांनी प्रात्यक्षिकातून मातीची मूर्ती कशी बनवायची हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेच्या सकाळ व दुपार विभागाच्या पाचशेच्यावर विद्यार्थिनींनी शाडू मातीचे गणपती बनवले.गणपती मूर्ती बनविल्यानंतर एक दिवस त्या सर्व मूर्ती सुकवण्यासाठी ठेवण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी त्यावर रंगकाम करण्यात आले. रंगकामनंतर सर्व शाडू माती गणपती मूर्ती प्रदर्शन भरविण्यात आले.

या कार्यशाळेस शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी,पर्यवेक्षिका एस.पी. बाविस्कर,आर.एस.सोनवणे, कैलास बाविस्कर, लिपिक शाम पवार यांनी सहकार्य केले. शाडू माती मूर्ती बनविणे कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सकाळ व दुपार विभागाच्या सर्व शिक्षक बंधु भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.