अमळनेरचा अभिमान : विशाल चौधरींना वारसा छायाचित्र स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरचा अभिमान : विशाल चौधरींना वारसा छायाचित्र स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

 

अमळनेर : विक्की जाधव.

रोटरी क्लब जळगाव तर्फे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित वारसा फोटो प्रदर्शन स्पर्धेत अमळनेरचे सुपुत्र विशाल चौधरी यांनी आपली कला सिद्ध करत हौशी गटात द्वितीय क्रमांक पटकावला.

गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर व प्रोजेक्ट चेअरमन राजेश यावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार वाघ यांनी फोटोग्राफी ही केवळ छायाचित्रण नसून, ती एक कला आहे जी वास्तवाला आणि संवेदनांना जपते, असे प्रतिपादन करत सर्व विजेत्यांचे कौतुक केले. स्पर्धेत हौशी गटातील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक तुषार मानकर, द्वितीय क्रमांक विशाल चौधरी (अमळनेर), तृतीय क्रमांक केतन महाजन तर उत्तेजनार्थ जे.पी. वानखेडे यांचा समावेश आहे. परीक्षक म्हणून आनंद मल्हारा, तुषार बुंदे व प्रमोद घोडके यांनी काम पाहिले. विशाल चौधरींच्या या यशाबद्दल अमळनेरकरांनी अभिमान व्यक्त केला असून, “छायाचित्रण क्षेत्रातील त्यांची मेहनत आणि कलात्मक दृष्टिकोन पुढील पिढीला प्रेरणा देणारा आहे,” अशा भावना अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन आणि सर्व सदस्य यांनी व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!