दिवंगत आनंद दिघेशी वार्तालाप (२६ऑगस्ट या स्मृती दिनी)

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिवंगत आनंद दिघेशी वार्तालाप
(२६ऑगस्ट या स्मृती दिनी) …
हॅल्लो दिलीप,
तू पण मला विसरलास काय रे ?
साहेब, तुम्हाला मीच काय,ठाणे जिल्हा विसरू शकत नाही. तो दिवस आमच्यासाठी काळा दिवस ठरला होता.
हो रे, मी दिवसभर गणपतीच्या दर्शनासाठी वणवण फिरत होतो. रात्री आनंद आश्रमात जाऊन विसावणार होतो इतक्यात एका शिवसैनिकाचा फोन आला, खूपच आग्रह केला, तो मोडवेना म्हणून जायचे ठरवले. माझा चालकही दमला होता.
साहेब तिथेच घात झाला. आपण त्याला नकार दिला असता तर हा दुर्घर प्रसंग टळला असता.
मी शिवसैनिकांचे मन मोडू शकत नाही हे तुला चांगले ठाऊक आहे. तुझ्या शाखेच्या वर्धापन दिनाला मी रात्री २-३ वाजता आलो तरी तुम्ही लोक जागे असायचे, माझी वाट पाहत. तसाच तोही वाट पाहत होता.
नेमकं काय घडलं होतं?
माझी जीप वंदना टॉकीज जवळ वळण घेत असताना अचानक बस डेपोतील एका बसशी टक्कर झाली. मला काही कळलेच नाही. पाय दुःखत होता. आम्ही लगेच सिंघानियात गेलो.
हो, ते तर मला ही ठाऊक आहे. पण पुढे काय झाले ? तुम्हाला डिपॉझिट घेतल्याशिवाय ऍडमिट करून घेत नव्हते, हे पण ऐकले आहे ?
साल्या, तू काय खबरी विचारतोस? हो, पण हे खरेच आहे. त्यावेळी मी पैसे बाळगले नव्हते. आणि आज सारखे डिजिटल payment, ATM फिटीएम नव्हते.
मग तुम्ही काय केले ?
त्यावेळी माझा जो बॉडीगार्ड होताना, त्यांने डिपॉझिट भरले आणि मी ऍडमिट झालो.
पण तुमच्या तर पायाला मार लागला होता, आणि हॉस्पिटलचे डॉक्टर बोलत होते, सर्व नॉर्मल आहे.
याचेच भांडवल करून तो नितेश राणे काय आणि तो एकनाथ शिंदे काय नको ते आरोप करीत असतात. तुमचा घातपात झाला ?
अरे त्या वेडxxना माझ्या मृत्यूचेही राजकारण करायचे असेल तर माझा नाईलाज आहे. मला राज भेटला, मला भेटणारी शेवटची व्यक्ती नारायण राणे ही होती.
हो ना, नारायण राणेनी तर, स्वतः च्या मुलाच्या म्हणण्याचे खंडण केले होते व कान उघडणीही केली, असे मला समजले आहे.
मग नेमका तुमचा मृत्यू कसा झाला ?
तुझ्या पासून काय लपवायचे. तुला ठाऊक आहे की, मी चेन स्मोकर होतो,मला हार्ट अटॅक आला तेव्हा तुही भेटायला आला होतास.
हो ना, तेही खरेच आहे !
माझे हार्ट ४० टक्के कार्यरत असल्याने कमजोर झाले होते, त्यामुळे मला जोरदार हार्ट अटॅक आला. हे कळताच डॉक्टरांनी शर्थिचे प्रयत्न केले, पण त्यांचाही नाईलाज झाला व ते मला वाचवू शकले नाहीत.
साहेब, तुम्ही गेल्याचे कळताच शिव सैनिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
त्यानंतर जो उद्रेक झाला त्यात सिंघानिया हॉस्पिटलची राख झाली.
हो रे, मलाही त्याचे दुःख झाले होते, परंतू मी बोलू शकत नव्हतो व काहीच करू शकत नव्हतो. नाहीतर मी ते होऊ दिले नसते.
साहेब एक गोष्ट विचारू का?
साल्या, तुझ्यातला पत्रकार मध्ये मध्ये उठत असतोच. ठिक आहे विचार काय ते !
एकनाथ शिंदे हा स्वतःला तुमचा पट्ट शिष्य म्हणवतो. मी तर त्याला १९८५ दरम्यान कधीही आनंद आश्रमात पाहिलेले आठवत नाही.
तो कसला रे पट्ट शिष्य? तू तर १९७४ पासून माझ्याकडे येत होतास, आत्ता मी मेल्यानंतर कोणी काहीही बोलू शकतो.
अजून एक शेवटची शंका विचारतो?
अरे, तू तर आहेसच शंकासुर, विचार आणि मला जावू दे !
साहेब, एकनाथ शिंदे म्हणतो तुमचा मृतदेह “त्याने खांद्यावर घेऊन खाली आणला ?”
तो काय स्वतःला रॉबिनहूड समजतो की मिस्टर इंडिया ? माणसाने किती खोटं बोलावं, याचे हे उदाहरण आहे?
तुला खरं सांगू, त्यावेळी तो हॉस्पिटल परिसरातही नव्हता. माझा मृतदेह हॉस्पिटल स्टाफ व पोलिसांनी खाली आणला व तिथून टेंभी नाक्यावर आणला. अश्या खोटारड्या माणसाने स्वतःला माझा पट्ट शिष्यच नव्हे तर शिष्यही म्हणवून घेऊ नये.
Ok. साहेब तुम्ही जाऊन २४ वर्षे झाली. तुमची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. उद्या तुमचा स्मृती दिन आहे. तुमचे ठाणे सुरक्षित ठेवा आणि गद्दारांपासून ठाण्याचे रक्षण करा, इतकीच विनंती.
असाल तिथे आनंदी रहा.
दिलीप मालवणकर
तुमचा एक लाडका शिव सैनिक
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!