अमळनेर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती अमळनेर व क्रीडा महासंघ अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुलात शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील कुस्तीपटूंनी जोशपूर्ण झुंज देत स्पर्धेला चुरस आणली. स्पर्धेचे उद्घाटन बजरंगबली प्रतिमेला पुष्पहार अर्पण व मैदान पूजन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमळनेर तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार प्रशांत धमके यांनी भूषविले. व्यासपीठावर माजी नगरसेवक प्रताप आबा शिंपी, माजी नगरसेवक संजय पाटील पहलवान, विश्वास पाटील पहलवान, महेश पाटील सर, डॉ. प्रा. देवदंत्त पाटील, टिनु बोरसे पहलवान, बापुराव सांगोरे सर, स्वप्नील पाटील सर, रत्ना सोनवणे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे प्रस्ताविक क्रीडा समन्वयक सुनिल वाघ यांनी केले.
स्पर्धेत पंच म्हणून महेश माळी, मनोज पाटील, योगराज चौधरी, के. आर. बाविस्कर, बापुराव सांगोरे यांनी काम पाहिले, तर गुणलेखनाची जबाबदारी स्वप्नील पाटील, आर. ए. घुगे, जयेश मासरे, एच. आर. बाविस्कर, विनायक सुर्यवंशी, दर्शन पाटील, योगेश पाटील यांनी पार पाडली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संयोजक क्रीडा शिक्षक सुनिल वाघ यांनी केले. विजयी कुस्तीपटूंना जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.