अमळनेर जी. एस. हायस्कुल, येथे सदभावना दिवस उत्साहात साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
जी. एस. हायस्कुल, अमळनेर येथे मेरा युवा भारत जळगाव व नेयुम संस्था यांच्या सहकार्याने सदभावना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आयएमए हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमवी प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. प्रा. संदीप नेरकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रा. संदीप नेरकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “जात, धर्म, भाषा किंवा प्रदेश या आधारावर भेदभाव न करता सर्व भारतीयांमध्ये भावनिक ऐक्य निर्माण करणे ही खरी सदभावनेची शिकवण आहे” असे सांगितले. त्यांनी राजीव गांधी यांच्या संगणकीकरणाच्या कार्याचा उल्लेख करत आजच्या तरुणांना रोजगार व नव्या संधींचे दालन खुले झाल्याचे सांगितले. तसेच नव्या भारतात युवकांना भेडसावणारी आव्हाने व त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली.या कार्यक्रमाचे आयोजन माय भारतचे अशोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्रीडा शिक्षक एस. पी. वाघ यांनी सूत्रसंचालन केले तर एन. आर. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. सुनील राजपूत, एस. आर. शिंगाणे, सी. एस. सोनजे, सौ. जयश्री भालेराव, आर. जे. पाटील, संजय बत्तीसे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे सदभावना दिनाला खरी ऊर्जाशक्ती लाभली.