बडगुजर समाज पंच मंडळातर्फे  विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला..

अपनी भाषा में पढ़े! Translate

बडगुजर समाज पंच मंडळातर्फे  विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

 

अमळनेर : विक्की जाधव.

बडगुजर समाज पंच मंडळ, अमळनेर तर्फे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ शिरूड नाका येथील बडगुजर समाज मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात चामुंडा मातेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट अनिल पाटील यांनी “आपली ऑनलाईन फसवणूक कशी टाळावी” या विषयावर मार्गदर्शन केले. घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक हे सायबर गुन्ह्यांचे सॉफ्ट टार्गेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या समारंभात प्रा. एम. एस. बडगुजर, डॉ. सुरेश शेठ बडगुजर, डॉ. विशाल बडगुजर यांसह मान्यवर उपस्थित होते. प्रा. एम. एस. बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात एकूण 16 विद्यार्थ्यांचा पालकांसह गुणगौरव करण्यात आला, तर सुमारे 140 विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देणारी प्रेरणादायी भाषणे केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंच मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. अध्यक्ष जगनाथ शेनपडूशेठ बडगुजर, उपाध्यक्ष प्रविण पुंडलीकशेठ बडगुजर, सचिव घन:श्याम मांडळकर, खजिनदार कैलास बडगुजर यांच्यासह कार्यकारिणीतील सर्व सदस्य सक्रियपणे सहभागी झाले. समाजातील शैक्षणिक वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी पंच मंडळ सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करीत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!