79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद.

अपनी भाषा में पढ़े! Translate

79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद

 

अमळनेर : विक्की जाधव

79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रताप कॉलेज (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरच्या वतीने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 दरम्यान पार पडली.स्पर्धेत एकूण 160 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यात 98 विद्यार्थिनी आणि 62 विद्यार्थी होते. कनिष्ठ विभागातील 8 विद्यार्थीही परीक्षेस उपस्थित होते.

या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. अरुण जैन यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजनात डॉ. विजय तुंटे, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. अमित पाटील, डॉ. धीरज वैष्णव, ग्रंथपाल दीपक पाटील, डॉ. माधव भुसनर, डॉ. रवी बाळसकर, डॉ. विलास गावित, डॉ. अनिल झळके, प्रा. रोहन गायकवाड, डॉ. बालाजी कांबळे, डॉ. राखी घरटे, डॉ. हर्ष नेतकर, प्रा. अमोल अहिरे, प्रा. हिमांशू गोसावी, डॉ. आकाश गव्हाणे, प्रा. विकास मोरे, प्रा. सागर सैदांणे, अमोल अहिरे, अतुल धनगर, महेश जाधव तसेच सीसीएमसी विभागाचे कर्मचारी दिलीप शिरसाठ, पराग पाटील आदींचे सहकार्य लाभले. प्रस्तुत स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात आयोजित समारंभात अतिथींच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!