राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग कामगिरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग कामगिरी

 

अमळनेर : विक्की जाधव 

राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग कामगिरी करत विजेतेपद मिळवले. आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत अंडर-14 व अंडर-17 वयोगटातील मुलींच्या संघाने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या संघाला पराभूत करून तालुका पातळीवरील विजेतेपद पटकावले. यामुळे दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. विजयानंतर शाळेच्या विद्यार्थिनींचे “हमारी छोरियां छोरों से कम है के?” म्हणत जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांनी कौतुक केले. तसेच प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनीही विजयी संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.या यशात शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. सागर चावरिया, श्री. केदार देशमुख, श्री. रमेश धनगर आणि श्रीमती ममता पाटील यांनी विद्यार्थिनींना दिलेल्या मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे मोलाचे योगदान आहे. शाळेतील सर्व शिक्षकांनी संघाचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!