भुरट्या चोरांना पिटाळण्यासाठी प्रतापियन्स सज्ज – अमळनेरमध्ये पेटला लढा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

भुरट्या चोरांना पिटाळण्यासाठी प्रतापियन्स सज्ज – अमळनेरमध्ये पेटला लढा!

 

अमळनेर : विक्की जाधव 

स्वातंत्र्य दिनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाची ठिणगी पेटली आणि आता हा लढा ज्वालामुखीचा आकार घेऊ लागला आहे. खानदेश शिक्षण मंडळातील भुरट्या चोरांविरोधात प्रतापियन्स रणसंग्रामासाठी सज्ज झाले आहेत. संस्थेचे संस्थापक प्रताप शेठजी यांनी प्रामाणिकपणे ही संस्था उभारली. गरीबांच्या लेकरांसाठी शिक्षणाचे माहेरघर व्हावे, या ध्येयाने त्यांनी आयुष्य झोकून दिले. परंतु दुर्दैवाने, हळूहळू चोरांनी यात घुसखोरी करून चोऱ्या सुरू केल्या आणि या संस्थेत मोठा दरोडा पडला. आज संस्थेची शान आणि मान या भुरट्यांच्या तावडीत सापडली आहे.

 

माजी प्राचार्य प्रा. डॉ. एल. ए. पाटील यांनी आंदोलनात ठाम भूमिका मांडली –

“ही संस्था जनसामान्यांच्या घामाच्या पैशातून उभी राहिली आहे. तिच्यावर डाका टाकणाऱ्या चोरांना गाडून टाकण्याची ताकद संघटित जनतेत आहे. आता प्रतापियन्स एकजुटीने या दरोडेखोरांविरोधात उभे राहिले पाहिजे.”

या आंदोलनात “फक्त पाच मिनिटं समाजकारणासाठी द्या – ही लढाई पवित्र आहे!” असा जोरदार नारा देत आयोजकांनी सर्वांना मैदानात उतरवले आहे. अमळनेर तालुक्यासह जिल्हाभरातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि नागरिक या उपोषणाला साथ देत आहेत.

सध्या तहसील दालनासमोर सुरू असलेला हा लढा केवळ संस्थेतील भ्रष्ट मंडळींच्या माजावर घाव घालण्यासाठीच नाही, तर संस्थेची प्रतिष्ठा आणि गरीब विद्यार्थ्यांचे हक्क परत मिळवण्यासाठी आहे. “आता जनता झोपणार नाही, भ्रष्टांना झोपवणार!” अशी घोषणाबाजी वातावरण तापवत आहे. अमळनेरमधून उठलेली ही ठिणगी खानदेशभर पेट घेईल यात शंका नाही.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!