मदनवाडी दहीहंडीचा थरार व लावणी सम्राज्ञी सिनेतारका राधा पाटील व दिग्गज नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत समृद्धी क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडी दहीहंडीचा थरार व लावणी सम्राज्ञी सिनेतारका राधा पाटील व दिग्गज नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत समृद्धी क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन

(निलेश गायकवाड)

अवघ्या इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या दहीहंडी उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सध्या सर्वत्र धाकुमाकूम…धाकुमाकूम… गोविंदा रे गोपाळा असा जल्लोष पाहायला मिळत आहे. भिगवन, मदनवाडी, तक्रारवाडी व परिसरामध्ये यांसह ठिकठिकाणी भव्य दिव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. भिगवन या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचा थरार पाहायला मिळत आहे. तसेच इंदापूर अनेक ठिकाणी भव्य दहीहंड्या आयोजित केल्या जातात. मदनवाडीतील समृद्धी क्रीडा प्रतिष्ठानची दहीहंडी ही सर्वात मोठी मानली जाते. यंदाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, नवनिर्वाचित कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर संग्राम जगताप अभिजीत पाटील सदाभाऊ खोत योगेश टिळेकर हर्षवर्धन पाटील दशरथ माने नरेंद्र पाटील रामभाऊ सातपुते यशवंत माने विनोद थोरात अप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने यांचा सह विविध दिग्गज मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख लावणी सम्राज्ञी सिनेतारका राध पाटील मुंबईकर हिच्या दिलखेच अदा आपणास पाहायला मिळणार आहेत मुळशी पॅटर्न मधील सिने अभिनेता देवेंद्र गायकवाड हार्दिक देखील उपस्थित राहणार आहे . तसेच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 51 हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता.

मदनवाडीच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकात सदर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे मदनवाडी गावातील सर्व युवकांनी या दहीहंडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहे. दहीहंडीची वेळ जशी जशी जवळ येत आहे तशी तशी युवकांमध्ये आपल्या मदनवाडी गावची दहीहंडीचा जल्लोष सोशल मीडिया वरती पाहायला मिळत आहे. तसेच प्रमुख पाहुण्यांना उपस्थित राहण्यासाठी त्यांना विशेष निमंत्रण देण्यासाठी युवकांची लगबग सुरू आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक समृद्धी क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक बंडगर , व भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका अध्यक्ष तेजस देवकाते यांच्याकडून सर्वांना देण्यात येत आहे. व सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!