खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश

अपनी भाषा में पढ़े! Translate

खानदेशकरांना रेल्वेची नवी भेट : तिरुपती–हिसार गाडीस अमळनेर व धरणगाव येथे थांबा मंजूर खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश..

 

खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश – 07717 व 07718 तिरुपती-हिसार गाडीस थांबा मंजूर

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेशकरांची अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 07717 व 07718 तिरुपती-हिसार रेल्वे गाडीस अमळनेर आणि धरणगाव येथे अधिकृत थांबा मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अखेर खानदेशच्या लोकप्रिय खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. स्थानिक प्रवासी, व्यापारी व विद्यार्थ्यांना या थांब्याचा मोठा लाभ होणार असून, प्रवास सोयीस्कर आणि वेळेची बचत होणार आहे.

नागरिकांनी खासदार स्मिताताई वाघ यांचे मनःपूर्वक आभार मानत, “खानदेशच्या विकासासाठी घेतलेला हा दूरदृष्टीचा निर्णय खरोखरच प्रशंसनीय आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!