अमळनेर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ‘फ्लाईट मोड’मध्ये  महत्त्वाच्या बैठकीत झोप, कार्यकर्त्यांची जागरूकता प्रश्नचिन्हाखाली!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ‘फ्लाईट मोड’मध्ये  महत्त्वाच्या बैठकीत झोप, कार्यकर्त्यांची जागरूकता प्रश्नचिन्हाखाली!

 

मार्मिक न्यूज नेटवर्क :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या १७ ऑगस्टच्या जिल्हा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी १० रोजी जळगाव जिल्हा कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी भूषवले होते.

मात्र, या महत्त्वाच्या चर्चेत अमळनेर तालुकाध्यक्ष भागवत पाटील व मुक्तार खाटीक हे बिनधास्त निद्रावस्थेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बैठकीत झोपा, कार्यात ढोपा! असा टोमणा काहींनी मारला तर काहींनी, “अमळनेरच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याऐवजी हे ‘आरामशीर’ नेतृत्त्व मिळालंय का?” असा प्रश्न विचारला.

स्वतःच्या कट्टर समर्थकांना मार्गदर्शन करत असताना आमदार अनिल पाटील यांच्या समोरच कार्यकर्त्यांची अशी झोप — हे फक्त असमर्थन की पुढील काळातील ‘निशब्द’ बंडखोरीचा संकेत? काही सूज्ञ नागरिक म्हणतात, “जेव्हा जागी राहण्याची गरज असते, तेव्हा झोपणे म्हणजे जनता आणि नेत्यावरील निष्ठेलाच ठेंगा देणे!”

आता अमळनेरच्या राजकारणात ही ‘झोपेची बैठक’ किती हलचल माजवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया..

30 वर्षे इमाने इतबारे एकनिष्ठ असलेला मी एकदम छोट्या कार्यकर्त्यापासून सुरुवात केली आहे. आज जे काय आहे ते पक्षामुळेच आहे रात्री झोप पूर्ण न झाल्याने दोन-एक मिनिटाची झोप लागली असेल. असे मुख्तार खाटीक यांनी मार्मिकशी बोलतांना सांगितले.

फोटो काढण्याचा वाद? 

आमच्याच कार्यकर्त्यांकडून नजरचुकीने हा फोटो काढला असेल त्याचा ध, चा’ म, न. केलेलाचं बरा मुख्तार खाटीक.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!