अमळनेरच्या नगरपरिषदेवर ‘शिंदे सेना’चा येणार झेंडा? — माजी आमदार शिरीष चौधरींचा हजारो गाड्यांसह मुंबईवर देणार ‘राजकीय धडक’!

अपनी भाषा में पढ़े! Translate

“भाकरी फिरतेय शिंदे सेनेकडे — माजी आ. शिरीष चौधरींच्या प्रवेशाने अमळनेरमध्ये सत्तेचे समीकरण बदलणार?”

 

अमळनेर : विक्की जाधव 

नुकत्याच विधानसभा, लोकसभा पार पडल्या आणि आता नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अमळनेर तालुक्यातील राजकारणाची ‘भाकरी’ पुन्हा भाजायला सुरुवात झाली असून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिंदे सेनेच्या वाटेवर पाऊल टाकताच, नगरपरिषदेचे समीकरण ढवळून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

येत्या काही दिवसांत हजारो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत धडक देत, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिरीष चौधरी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, भावी नगरसेवक आणि असंख्य सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाचा उद्देश स्पष्ट आहे — येऊ घातलेल्या अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणे! यासंदर्भात नुकतीच इंदुमाई आमदार कार्यालयात भव्य बैठक पार पडली. उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी रणनीतीचे मार्गदर्शन देण्यात आले. उपस्थितांमध्ये आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि शहरातील प्रभावशाली सामाजिक कार्यकर्त्यांची दाटी होती.

राजकीय विश्लेषकांच्या मते, विधानसभेच्या निवडणुकीत शिरीष चौधरी यांचा मतदानाचा टक्का शहरात कोठेही घटलेला दिसला नाही. हा ‘मतांचा पायंडा’च त्यांना नगरपरिषदेच्या लढतीत मोठा फायदा करून देईल, अशी चर्चा सध्या अमळनेरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अमळनेरच्या राजकारणात हा ‘शिंदे झंकार’ किती प्रभाव पाडतो, हे आगामी महिन्यांत स्पष्ट होईल… पण एक गोष्ट नक्की — या प्रवेशाने नगरपरिषदेची लढत थेट शिखरावरून सुरू होणार आहे!

जाहिरात :

(इच्छुक उमेदवार आहात ? मार्मिक सोबत करा तुमचा प्रभावी प्रचार. संपर्क : 9175050300)

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!