अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत : स्व. गोविंददादा मुंदडे यांच्या आठवणींना उजाळा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत : स्व. गोविंददादा मुंदडे यांच्या आठवणींना उजाळा..

 

 

मार्मिक समाचार – विक्की जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट

अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सर्वसाधारण सभेत सभासद आणि बँकेचे माजी चेअरमन स्व. गोविंददादा मुंदडे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. अमळनेरच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात चार दशके भक्कम नेतृत्व करणाऱ्या गोविंददादांच्या कार्याची उजळणी या सभेत करण्यात आली.

५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने गोविंददादा मुंदडे यांचे दुःखद निधन झाले. माजी नगराध्यक्ष, खाशी मंडळाचे चेअरमन, भूविकास बँक तसेच अर्बन बँकेचेही चेअरमन म्हणून त्यांनी लोकसेवेचे व्रत जपले.

सजग नेतृत्व, स्पष्टवक्तेपणा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य माणसाशी निगडीत राहण्याची त्यांची खास ओळख होती. व्यायामाचा छंद, कणखर देहयष्टी, शिस्तप्रिय स्वभाव आणि वेळेचं काटेकोर नियोजन यामुळे ते अनेकांचे प्रेरणास्थान ठरले.

भोसला मिलिटरी स्कूलमधून शिक्षण घेतलेले दादा लहानपणापासूनच शिस्तप्रिय होते. त्यांच्या जाण्याने मुंदडा कुटुंबासह संपूर्ण अमळनेर शहराने एक कणखर नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची, विचारांची आणि माणुसकीची सावली कायम अमळनेरवर राहील, अशा भावपूर्ण शब्दांत उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमास जेष्ठ संचालक प्रविण जैन, मोहन सातपुते, भरत ललवाणी, लक्ष्मण महाजन, प्रदीप अग्रवाल, दीपक साळी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, सौ. वसुंधरा लांडगे, डॉ. मनिषा लाठी, ॲड. व्ही. आर. पाटील, ॲड. विजय बोरसे, बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सभासद सोमचंद संदांनशिव, दिलीप ठाकूर, पी. वाय. पाटील, प्रफुल भदाणे, उमाकांत नाईक, एस. टी. पाटील, गुलाब महाजन बॅंकेचे सर्व सभासद आणि समस्त अमळनेरकर उपस्थित होते.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!