शिरपूरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांचा भाजपा तर्फे सत्कार
शिरपुर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, मंत्रालय मुंबई यांचा शिरपुरात आगमन निमित्त भाजपा तर्फे सत्कार करुन स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांचे शिरपुर फाटा येथे भाजपा तर्फे दि. १० आॅगस्ट रोजी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपुर भाजपा मा. तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे यांनी सत्कार करुन भावीवाटचालीस शुभेच्छा दिल्यात. मध्य प्रदेशमधील सेंधवा येथे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक हे जात असतांना त्यांनी शिरपुर फाटा येथे भाजपा पदाधिकार्यांची भेटीगाठी घेतल्यात. त्यांनी यावेळी सांगितले की, राज्यातील गरीब, अत्यंत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना वैद्यकीय, नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी सुरू केली आहे. या निधीचा उद्देश गरजूंना तात्काळ आणि पारदर्शक पद्धतीने मदत पोहोचविणे हा आहे. निदान व उपचारासाठी लागणा-या वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक (रुग्ण खाजगी रुग्णालय दाखल असल्यास सदरहू अंदाजपत्रक जिल्हा शल्यचिकित्सक यांचेद्वारा प्रमाणित करुन घेतलेले असावे). तहसलिदार कार्यालयाद्वारे प्रमाणित चालू आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला. (रु १.६० लाख असणे आवश्यक आहे). रुग्णाचे आधार कार्ड/लहान बालकांच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधारकार्ड, रुग्णाचे रेशन कार्ड, संबंधीत व्याधी विकार/आजाराचे संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत रिपोर्ट आवश्यक असुन कॉकलियर इम्प्लांट / अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया वय वर्षे २ ते ६, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थीमञ्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधीत शस्त्रक्रिया, मेंदुचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात/विद्युत जळीत रुग्ण इत्यादी आजारासाठी मदत मिळते. विहित नमुन्यात अर्ज भरून, आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत आणल्यास मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामधून सदरील अर्ज (E-mail ID: aao.cmrf.mhgov.in) ई-मेलद्वारे पाठवावा. त्या नंतर सदरील अर्जात नमूद माहितीच्या आधारे रुग्णांचे सहाय्यता निधी मंजूर करण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी /धर्मादाय/मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालय असणे आवश्यक आहे. रुग्णांवर करण्यात येणारे उपचार हे सी एम आर एफ अंतर्गत मान्यता प्राप्त असावे व आजार यादीत असावा. आपण आपल्या परिसरातील व तालुक्यातील गरजु रुग्णाला मदत करावी असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी यावेळी पदाधिकार्यांना सांगितले. धुळ्यात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अध्यक्ष डॉ. योगेश पाटील हे आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय मदत कक्ष, माहिती व जनसंपर्क भवन, तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे पाठवावीत असे हि त्यांनी सांगितले.