VVPAT मशिन नसेल तर आम्ही निवडणूक प्रक्रिया वर बहिष्कार घालु.- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट.

अपनी भाषा में पढ़े! Translate

VVPAT मशिन नसेल तर आम्ही निवडणूक प्रक्रिया वर बहिष्कार घालु.-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – निवडणूक आयोगाकडून सध्याच्या प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारचा बदल केला जात आहे सामान्य जनतेवर निवडणूक आयोग अनेक अडचणीचे नियम लावण्याचे काम का करत आहेत व कशासाठी ह्या गोष्टी मुळे सामान्य जनतेची फसवणूक होत आहे ईव्हीएम मशीन वर मतदान घेणार असाल तर व्ही व्ही पी ए टी मशीन बसवणे गरजेचे आहे ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपीएटी मशीन बसवणार नसेल तर त्या विरोधात आम्ही निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालू तसेच ईव्हीएम मशीन च्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घ्यावी असा इशारा दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्याकडून देण्यात आला आहे त्यासाठीचे निवेदन दौंड तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस दौंड शहर अमित पवार यांच्यासोबत अप्पासाहेब पवार तालुका अध्यक्ष, सचिन गायकवाड शहराध्यक्ष दौंड ,अमित पवार युवक अध्यक्ष, प्रकाश सोनवणे काँग्रेस कमिटी, पंकज नांदखेले विद्यार्थी अध्यक्ष, श्रेयस सोनवणे सामाजिक न्याय अध्यक्ष, प्रथमेश चव्हाण, तसेच सोबत आनंद पळसे , पठारे यांनी निवेदनावर सह्या करून आपला विरोध नोंदवला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!