अमळनेरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न : गोगादेव छडी मिरवणुकीत गटांमध्ये हाणामारी – तिघे जखमी
अमळनेर मार्मिक न्यूज नेटवर्क,शहरातील गोगादेव छडी मिरवणुकीदरम्यान काल रात्री दोन गटांच्या छड्या समोरासमोर येताच वाद चिघळला आणि क्षणातच हाणामारी, काठ्यांचा मारा आणि चाकूचे वार सुरू झाले. यात तिघे गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी तणाव वाढत असतानाच पोलिसांनी तातडीने जमावात घुसून परिस्थिती नियंत्रणात आणली. अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. मात्र, धार्मिक मिरवणुकीच्या कार्यक्रमात अशी हिंसक चकमक होणे हे शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठीधुळे हलविण्यात आले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. संवेदनशील भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.