अमळनेर शहर : डेंग्यू, टायफॉईड, मलेरिया  रोगराईच्या सावटाखाली, लोकांचा जातोय जीव पालिकेची झोप अजूनही गाढ! 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर शहर : डेंग्यू, टायफॉईड, मलेरिया  रोगराईच्या सावटाखाली, लोकांचा जातोय जीव पालिकेची झोप अजूनही गाढ! 

विविध ठिकाणी फवारणी, स्वच्छता मोहीम राबवण्याची होतेय मागणी..

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात डेंग्यूचे डोके वर काढणे, टायफॉईड आणि मलेरियाची साथ वाढणे या गंभीर परिस्थितीतही पालिका प्रशासन मात्र गेंड्याच्या कातडीसारखे निष्क्रिय झाले आहे. मुख्याधिकारी परिवारास वेळ दयायचा तर सुट्टीवर जा.. असे लोक बोलू लागले आहेत. विविध भागात घाणीचे साम्राज्य, साचलेले पाणी, कचऱ्याचे ढिग आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, अधिकारी मात्र कोणाच्या आश्रयाखाली शांत बसल्याची चर्चा जनतेत आहे. रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत रोज वाढ होत असून, टायफॉईड आणि मलेरियाचेही नवे रुग्ण समोर येत आहेत. तरीही आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर फवारणी, स्वच्छता मोहीम किंवा ठोस प्रतिबंधात्मक पावले दिसत नाहीत.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे हे ढिसाळ धोरण तातडीने थांबवून पालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता, फवारणी आणि जनजागृती मोहीम सुरू करावी, अन्यथा शहरात रोगराई मोठया प्रमाणात वाढण्याची होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या ढिमक्या कारभारावर जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!