गावगाड्यांच्या प्रश्नांवर ग्रामविकास मंत्र्यांसमोर सरपंच परिषदेच्या विविध मागण्याना प्रतिसाद
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.
महाराष्ट्रातील गावगाड्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. दत्ताभाऊ काकडे (बीड) यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा सौ. सुषमाताई देसले पाटील यांच्यासह अमळनेर तालुक्यातील श्री महेंद्र बोरसे यांचाही या बैठकीत सहभाग होता.

महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री गोरे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सरपंच भवन निर्मिती, सरपंच-उपसरपंच मानधन, गावठाण व ग्रामपंचायत हद्दवाढ, ग्रामसेवक-तलाठी-लाइनमन-कृषी सहाय्यकांना एकाच ग्रामपंचायतीचे प्रभार, तसेच पंचायत समिती स्तरावर सरपंचांची मासिक बैठक अशा २० प्रमुख मागण्या या वेळी मांडण्यात आल्या. मंत्री गोरे यांनी मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले.