अमळनेर पारोळा महसूल सप्ताहात कर्मचाऱ्यांचा भव्य गौरव सोहळा..
अमळनेर : विक्की जाधव.
जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि निष्ठा यांची कास धरून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा महसूल सप्ताहानिमित्त भव्य गौरव सोहळा पार पडला. अमळनेरचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, महसुल नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके, संगायो नायब तहसीलदार आर. आर. ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसील कार्यालयातील महसुल सहाय्यक मुकेश काटे, जगदिश पाटील, अनिल चौधरी, प्रदीप महाले, सचिन निकम, किरण मोरे, जितेंद्र पवार तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नईम मुजावर व पंकज शिंपी यांचा उत्कृष्ट कार्यासाठी गौरव करण्यात आला.

याचसोबत, अमळनेरचे भूषण ठरलेले पारोळा तहसील कार्यालयाचे सहाय्यक महसूल अधिकारी महेश रमेश जाधव यांचा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समर्पित कार्य, सेवाभाव आणि जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण विभागासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
