फाफोर बुद्रुक येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

फाफोर बुद्रुक येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

अमळनेर : विक्की जाधव

२९ जुलै रोजी फाफोरे गावातील परिसरात एक अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत पकडले. सदर ट्रॅक्टरवर कोणतेही वैध परवाने अथवा आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. या कारवाईमध्ये तहसीलदार रुपेश सुराणा, मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ (टाकरखेडे), तसेच ग्राम महसूल अधिकारी अभिमान जाधव (कन्हेरे) यांचा समावेश होता.

गावात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या या कृतीमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!