रोहित्रात केली हातचलाखी – शहर अंधारात, चोरटे मजेत!
महावितरणच्या रोहित्रातील कॉपर पट्ट्यांची चोरी; वीजपुरवठा खंडित होण्यामागचं कारण अखेर उघडकीस
अमळनेर : विक्की जाधव
शहरात सतत वीजपुरवठा खंडित होण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अखेर खऱ्या अंधारात टाकणारा प्रकार समोर आला आहे. महावितरणच्या रोहित्रातून चक्क कॉपरच्या पट्ट्याच चोरीला गेल्याचे उघड झाले आहे.
१ जून ते २५ जुलै दरम्यान शहरातील विविध ठिकाणी वीज खंडित होत असल्याने, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रोहित्रांची तपासणी केली. तपासणी दरम्यान लक्षात आले की, रोहित्रातील धातूच्या – म्हणजेच कॉपरच्या पट्ट्या गायब आहेत! या प्रकरणी सहाय्यक अभियंता हेमंत सैंदाणे यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दाखल केली असून, तपासात धक्कादायक बाब समोर आली – नगरपरिषदेच्या वीज दुरुस्तीचे काम करणारे बाह्य स्त्रोत कर्मचारी तुषार पाटील व हर्षल पाटील (रा. मंगरूळ) यांनीच या पट्ट्यांची चोरी केल्याचा संशय आहे. या दोघांनी प्रत्येकी २५ ग्रॅम वजनाच्या, एकूण ५० ग्रॅम वजनाच्या ५,५०० रुपये किंमतीच्या कॉपर पट्ट्या चोरल्या आहेत. अमळनेर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.