श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील प्रथम सोमवारी रुद्राभिषेक

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील प्रथम सोमवारी रुद्राभिषेक

 

अमळनेर :  विक्की जाधव 

श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात दर वर्षी प्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. २८ रोजीच्या पहिल्या श्रावण सोमवारी भटू रमेश चौधरी सपत्नीक पूजेचे मानकरी होते.

भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात गणपती पूजन करून महादेवांचा अभिषेक करण्यात आला. मंदिराचे पुरोहित यतीन जोशी मेहुल कुलकर्णी आणि वैभव लोकाक्षी यांनी पौराहित्य केले. महाआरती करून रुद्राभिषेकाची सांगता झाली.

यावेळी मंगळ ग्रह सेवासंस्थेचे सेवेकरी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!