भागवत रोडवरील खड्ड्यांचा विळखा – शाळकरी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ! सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष, प्रशासन मौन.
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील भागवत रोडची अत्यंत बिकट अवस्था ही आता केवळ नागरी समस्याच राहिलेली नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर विषय ठरला आहे. या रस्त्यावर डी.आर. कन्या शाळा आणि पी.बी.ए. स्कूल असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या मार्गावरून शाळेत ये-जा करतात. तर ग्रामीण भागातील कॉलेजला जाणारे विद्यार्थी देखील याच रस्त्याचा वापर करत असतात.
नवीन रस्ता केवळ चार -सहा महिन्यांपूर्वी झालेले असूनही रस्ता इतक्या लवकर उखडल्याने मोठा खड्डा पडून कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची आणि कमिशनखोरीचा गंभीर संशयाची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पाणी साचुनतुंबलेला भाग आणि वाहतुकीचा गोंधळ यामुळे विद्यार्थी अपघातग्रस्त होत आहेत. काही विद्यार्थिनी सायकलवरून पडून गंभीर जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. सत्ताधाऱ्यांनी या विषयावर मौन धारण केले असून प्रशासनाचा हलगर्जीपणा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करत आहे. या परिस्थितीमुळे रस्त्यालगतचे दुकानदारही त्रस्त झाले आहेत. दैनंदिन व्यवसायावर परिणाम होत आहे. तर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे येथील कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या समस्येवर तातडीने उपाययोजना व्हावी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट्स हटवावेत, तसेच सकाळी व संध्याकाळच्या शाळेच्या वेळेत बसस्थानक परिसरात वाहतूक पोलीस नेमावेत, यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देखील सादर केले होते
या निवेदनावर पुढील कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या :
सागर विसपुते, चंद्रकांत कंखरे, मुकेश चौधरी, भावेश साळुंखे, सागर वाघ, सुशांत संधानशिव, राहुल कंजर, जयेश मालपुरे, अविनाश चौधरी, राज लाड, आशिष अंधारे, मनोज शिंगाणे, योगेंद्र बाविस्कर.
या कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, “जर दोन दिवसांत योग्य कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”शहरातील सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्था सध्या या प्रश्नाकडे पाहत आहेत – ‘प्रशासन केव्हा जागे होणार?’
