श्रावणाच्या भक्तीमय वातावरणात विद्येश्वर महादेव मंदिराची कावळ यात्रा उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रावणाच्या भक्तीमय वातावरणात विद्येश्वर महादेव मंदिराची कावळ यात्रा उत्साहात संपन्

 

अमळनेर : विक्की जाधव

श्रावण मास सुरू होताच भोलेनाथाच्या भक्तीत रंगलेले भाविक विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दि. २७ जुलै २०२५ रोजी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर असा पारंपरिक पायी कावळ यात्रा सोहळा उत्साहात पार पडला.

यात्रेच्या प्रारंभी जळोद येथे अनिल साळुंखे आणि भैय्या साळुंखे यांनी यात्रेकरूंसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. तर यात्रेदरम्यान जयंत पाटील, योगेश वाल्हे यांनी चहा-पाण्याची सोय करून यात्रेचे वातावरण आणखी उत्साहवर्धक केले. यावेळी रवि पाटील, विकी जाधव (पत्रकार), संजय पाटील, अशोक साळुंखे, अमोल पाटील, सुनिल शिगांणे, प्रवीण गुजर, विजय क्षत्रिय साहेब, रोहित तेले, कल्पेश साळुंखे, नरेंद्र गुजर, मिलींद वारुळे, विवेक पाटील, सनी पाटील, सचिन सोनवणे, मोहित पवार, भागीरथ पाटील, अनिल शिगांणे, चेतन पाटील, यश अहिरे, प्रवीण वाघ, सुभाष चव्हाण, विलास सोनवणे, दिपक गुजर, सिद्धार्थ पाटील यांसह अनेक महिला भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

भक्तांच्या हरिनाम, “बोल बम” हर हर महादेव, च्या जयघोषात श्रावणातील ही पायी कावळ यात्रा धार्मिक उत्साहाचे द्योतक ठरली. स्थानिक नागरिकांनी यात्रेचे स्वागत करून भाविकांवर फुलवृष्टी करत उत्सवाचे सोहळ्यात रूपांतर केले.

या यात्रेत सहभागी भाविकांनी सांगितले की, “प्रत्येक वर्षी या कावळ यात्रेत चालताना होणारा थकवा भोलेनाथाच्या नावाने क्षणात नाहीसा होतो. यात्रेचा प्रत्येक पाऊल हा भक्तीचा आणि समाधानाचा अनुभव देणारा असतो.”

कावळ यात्रा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसरात महाआरती आणि प्रसाद वितरण करण्यात आले. श्रावणातील या पवित्र कावळ यात्रेने अमळनेर परिसरातील धार्मिक वातावरण अधिकच मंगलमय केले असून, पुढील वर्षीही अधिक संख्येने भाविक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!