अमळनेरमध्ये रस्त्यांची दुर्दशा; खड्ड्यामुळे चालणे झाले बेहाल इतका निधी गेला कुठे??
अमळनेर : विक्की जाधव
“इतका निधी आणला, इतका निधी आणला” अशा घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता नागरिकांचा थेट सवाल – तो निधी गेला कुठे? तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहता, कागदोपत्री आकडेवारी आणि प्रत्यक्ष वास्तव यात प्रचंड तफावत असल्याचे स्पष्ट होते. वाहनधारकांसाठी प्रवास म्हणजे धोका आणि जीवावर बेतणारी कसरत बनली आहे.

शहरातील कलागुरुनगर, रामनगर, सुरभी कॉलनी, गुरु कृपा कॉलनी, विद्या विहार कॉलनी, शिरुड नाका, आर.के. नगर या भागांतील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरू होताच रस्ते चिखलात बदलतात, खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होते आणि पायी चालणे देखील कठीण होते. ८० फुटी रस्त्याचे चालू असलेले काम अर्धवट पडल्याने चिखल, पाणथळ्या आणि धोकादायक खड्ड्यांचा त्रास दुप्पट झाला आहे.
या परिस्थितीबद्दल वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. उलट, प्रसिद्धीपत्रकांतून मोठमोठ्या दाव्या केल्या जातात, पण प्रत्यक्षात मात्र नागरिकांना हाल सोसावे लागतात. ‘कागदावरचे विकासकाम नकोत, आम्हाला खऱ्या रस्त्यांची गरज आहे,
“कागदोपत्री आकडे, भाषणं आणि फोटो काढणे थांबवा; रस्ते बनवा, अन्यथा जनतेचा रोष उफाळून येईल.” – त्रस्त नागरिकांची लोकप्रतिनिधीना थेट चेतावणी.