अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत प्रथमच स्केटिंग मॅरेथॉन; चिमुकल्या क्रिशिव लकडेची ब्राँझ झेप

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-27 at 1.24.59 PM

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत प्रथमच स्केटिंग मॅरेथॉन; चिमुकल्या क्रिशिव लकडेची ब्राँझ झेप

बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे दि.26 जुलै 2026 रोजी Marathon Skating Association Maharashtra यांच्या वतीने “1st Marathon Skating State Championship 2026” या राज्यस्तरीय स्केटिंग मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. बारामती नगराध्यक्ष सचिन सातव यांनीही स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत बारामतीतील राहुल स्केटिंग अकॅडमी (Team RSA) च्या खेळाडूंनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. त्यामध्ये कु. क्रिशिव केशव लकडे हा सर्वात लहान चिमुकला स्पर्धक ठरला. लहान वयातही त्याने आत्मविश्वासाने आणि जिद्दीने स्पर्धा पूर्ण करत उत्कृष्ट कामगिरी केली.

विद्या प्रतिष्ठानचा विद्यार्थी असलेल्या क्रिशिवने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ब्राँझ पदक (Bronze Medal) पटकावले. त्याच्या या यशामुळे राहुल स्केटिंग अकॅडमी, विद्या प्रतिष्ठान, त्याचे पालक, प्रशिक्षक तसेच बारामतीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बारामतीमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्केटिंग मॅरेथॉन स्पर्धेमुळे स्केटिंग खेळाला नवी चालना मिळाली असून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भविष्यात अशा स्पर्धांमधून अनेक होतकरू खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!