श्री स्वामी समर्थ धाम, बेसा येथे भव्य दिंडी सोहळा संपन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-27 at 4.25.13 PM

श्री स्वामी समर्थ धाम, बेसा येथे भव्य दिंडी सोहळा संपन्न…

:- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर (स्वामीधाम), बेसा, नागपूर येथे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते.
दिंडीमध्ये शेकडो वारकरी, भाविक, महिला-पुरुष, युवक तसेच विविध भजन मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात आणि विठ्ठल-रुक्मिणी व श्री स्वामी समर्थ यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. दिंडी मार्गावर भाविकांनी दर्शन घेऊन पुष्पवृष्टी करत भक्तिभाव व्यक्त केला.

WhatsApp Image 2026-07-27 at 4.25.15 PM

या सोहळ्यात विदर्भातील अमरावती, भंडार, वर्धा नागपूर जिल्ह्यातील भंजन मंडळींनी उपस्थिती दर्शवून आपल्या सुमधुर भजन व नामसंकीर्तनातून भक्तिरसाची अनुभूती दिली. मंडळाच्या सहभागाचे उपस्थित भाविकांनी कौतुक केले.

WhatsApp Image 2026-07-27 at 4.25.14 PM

दिंडी सोहळ्यात उत्कृष्ट दिंड्यांसाठी बक्षिसे ठेवण्यात आले होते. प्रथम पुरस्कार २१००१ रुपयाचे बक्षीस कर्मयोगी गाडगे बाबा भजन मंडळ इसापूर अमरावती यांनी पटकावले. द्वितीय पुरस्कार १५००१ रुपयाचे बक्षीस ज्ञानेश्वरी भंजन मंडळ जमठा नागपूर यांनी पटकावले, तृतीय पुरस्कार ११००१ रुपयांचे बक्षीस श्री संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ भजन मंडळ किंन्हाळ मकळी नागपूर यांनी पटकावले. चतुर्थ पारितोषिक ९ टाळ व मृदंग या स्वरूपात शारदा महिला भजन मंडळ सुकळी धारपुरे नागपूर यांनी पटकावले व पंचम पारितोषिक ७ टाळ व मृदंग या स्वरूपात शिव महिला भजन मंडळ देवळी गुजर नागपूर यांनी पटकावले. बक्षिसास पात्र न ठरलेल्या सर्व भजन मंडळांना शाल श्रीफळ व मानधन देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आराधना परिवार व कर्मयोगी फाउंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व वारकरी, भाविक, स्वयंसेवक आणि सहभागी भजन मंडळांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली..

WhatsApp Image 2026-07-27 at 4.25.14 PM (1)

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!