श्री संत गाडगेबाबा पालखी सोहळा समारोपीय कार्यक्रमात श्री . सतिश राव सोनोने संत गाडगेबाबा चे पणतू यांचा सत्कार सपन्न..
कारंजा लाड,,,,,,

निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा पालखी सोहळा आषाढी वारी,, दिनांक, 15जुलै2027रोजी संत गाडगेबाबा समाधी मंदिर अमरावती येथून श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले.
वारीचे मार्गात विविध ठिकाणी भक्ती सह संत गाडगेबाबा संदेशाचा जागर,,, स्वच्छतेच्या वाटेवर चालण्याची सर्वांची अपेक्षा असते परंतु स्वच्छतेकडे दुर्लक्ष करता कामा नये हा संत गाडगेबाबा च्या महा मंत्राचा देखील या वारी दरम्यान करण्यात आला, ही वारी मजल दरमजल करीत पंढरपूरी आषाढी एकादशीच्या पर्वावर स्थानापन्न झाली, किर्तन,, प्रवचन,, प्रबोधन करुन परत माघारी स्वगृही येताना,, श्री क्षेत्र कारंजा लाड येथे, श्री राजेश ठाकूर,, हाॅटेल तिरुमला,, आयोजित समारोप, ठाकूर परिवार व मित्रमंडळी च्या वतीने जल्लोषात गोपाला गोपाला देवकी नदंन गोपाला च्या गजरात स्वागत करण्यात आले,, पालखी चे यथोचित पुजन, करण्यात आले,, त्यावेळी खास, भजन, गवळण, फुगडी यात भक्त मंडळी नी सहभाग घेतला,, याच दिवशी संत गाडगेबाबा पालखी सोहळ्याची परंपरा 1957,पासुन, ह. भ. प. वासुदेव महाराज सोनोने संत गाडगेबाबा चे नातू, यांनी अखंडीत सुरू ठेवली तिच परंपरा वासुदेव महाराज अलोकाबाई फकीर जी, सोनोने च्या नंतर संत गाडगेबाबा चे पणतू श्री सतिश राव सोनोने गेली कित्येक वर्षांपासून ही पालखी श्रीक्षेत्र अमरावती ते पंढरपूर, या मार्गावर चालवीत आहे,, त्यांच्या या भक्तिमय मार्गाची व संत गाडगेबाबा,, नंतर वासुदेव महाराजांनी सुरू केलेल्या मार्गावर आपली वाटचाल सुरू ठेवली म्हणून श्री संत गाडगेबाबा नागरी सहकारी पत संस्था कारंजा लाड चे वतीने, श्री विश्वनाथ राऊत अध्यक्ष श्री संत गाडगेबाबा नागरी सहकारी पत संस्था कारंजा लाड तथा मार्गदर्शक डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र यांनी त्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मानित करुन शाल श्री फल देऊन सत्कार करण्यात आला.. याच वेळी पालखी चे विणेकरी, श्री, रमेश निंबाळकर यांचा सत्कार श्री प्रकाश गवळीकर डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन यांनी, ज्ञानेश्वरी ग्रंथ, शाल श्री फळ, मोमेंट देऊन सत्कार करण्यात आला, बाबांच्या पालखी सोहळ्यात वाहन सेवा देणारे श्री प्रकाश चौधरी अकोला यांचा सत्कार प्रा. रमेश सांबसकर कारंजा यांनी शाल श्री फळ देऊन केला,, श्री, गजानन आसरे,तराळा, वसंता तिडके,कारंजा, श्रीकृष्ण सोनोने विळेगांव यांनी पोलीस दलातील सेवा निवृत्त तायडे साहेब,, व श्री डिंगाबर काळे सेवाधारी यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..
राजेश ठाकूर यांनी आयोजित केलेल्या यथोचित महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतल्यानंतर आरती करून पालखी स्वगृही रवाना झाली, या प्रसंगी ठाकूर परिवार, त्यांचे मित्र मंडळ, व भक्त प्रेमी प्रामुख्याने हजर होते.