जिओ नेटवर्कच्या त्रासाला भिगवण नागरिक संतप्त;कंपनीचा कारभार गोलमाल

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-26 at 10.28.56 AM

जिओ नेटवर्कच्या त्रासाला भिगवण नागरिक संतप्त;कंपनीचा कारभार गोलमाल

(निलेश गायकवाड)

भिगवण शहर व समर्थनगर परिसरात मागील काही दिवसापासून नेटवर्क संथ गतीने चालत असून जिओ मोबाईल नेटवर्क वारंवार ठप्प होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटवर्कची समस्या अधिक तीव्र झाली असून, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन शिक्षण, शासकीय कामकाज तसेच आपत्कालीन संपर्क व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांना मध्ये तीव्र नाराजीची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात कधी अर्धा तास तर कधी दिवसभर मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत होत आहे. मोबाईलवर ओटीपी वेळेवर प्राप्त होत नसल्याने बँक व्यवहार अडकत आहेत. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अडथळे निर्माण होत असून, व्यापाऱ्यांचे यूपीआय व्यवहार खोळंबत आहेत. तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पूर्ण रिचार्जचे शुल्क भरूनही दर्जेदार सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप वाढत आहे. संबंधित कंपनीने तातडीने तांत्रिक उपाययोजना करून नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अन्यथा ग्राहकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

प्रतिक्रिया :

“घरी आल्यानंतर मालाची ऑर्डर द्यायची किंवा ऑनलाईन पेमेंट करायचे झाले, तरी नेटवर्क नसल्यामुळे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे वेळ आणि आर्थिक दोन्ही प्रकारचे नुकसान सहन करावे लागत आहे. जिओ कंपनीने ही समस्या तातडीने सोडवावी.”

—उदय खिवंसरा, व्यावसायिक, भिगवण

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!