आषाढी यात्रेत सेवाभावाचा सुंदर आदर्श; जी.एस. हायस्कूल (1986–91) च्या विद्यार्थी कडून भाविकांना पाणी बॉटलचे वाटप
अमळनेर : विक्की जाधव.
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराजांच्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याच सेवाभावी परंपरेला पुढे नेत जी.एस. हायस्कूल (1986 ते 1991) च्या विद्यार्थीनी यात्रेकरूंना मोफत थंड पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा उपक्रम पार पडला.
यात्रेसाठी दूरदूरवरून आलेल्या वारकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये व त्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने मित्र परिवाराने ही सेवा राबविली. भाविकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत मित्र परिवाराच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सेवाकार्यात दत्ता कासार, शरद पाटील, किर्तीकुमार कोठारी, मुकेश पारख, संजय वंजारी, अजय कासार, मुकेश शारदुल आणि कृष्णा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.