अमळगाव विकासो चेअरमनपदी संजय चौधरी, व्हा. चेअरमनपदी ज्ञानेश्वर शिंदे बिनविरोध

अपनी भाषा में पढ़े! Translate

_DSC9924

अमळगाव विकासो चेअरमनपदी संजय चौधरी, व्हा. चेअरमनपदी ज्ञानेश्वर शिंदे बिनविरोध

अमळगाव (अमळनेर) :- येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित च्या चेअरमनपदी संजय माधवराव चौधरी यांची आणि उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन) पदावर ज्ञानेश्वर आनंदा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीसाठी २४ जुलै २०२६ रोजी संस्थेच्या कार्यालयात बैठक झाली. अमळनेरचे एस.पी. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. सर्व संचालक मंडळाने एकमताने ही निवड केली.                                                                                                                                                                                                                                            मुख्य मुद्दे:संजय चौधरी हे अमळगाव ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचे वडील स्व. माधवराव देवचंद चौधरी हे गावातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व होते. ते त्यांचाच वारसा चालवत आहेत.
निवडीप्रसंगी मिलिंद पाटील, रावसाहेब पाटील, प्रवीण पाटील, गिरिश पाटील, पंकज चौधरी, राजेंद्र पाटील, संजय भाऊराव पाटील, सुभाष शालिकराव पाटील, हिम्मत पारधी, प्रभावती पाटील, सुनीता पाटील इत्यादी संचालक उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात निवड झाली.

नवनिर्वाचित चेअरमन संजय चौधरी यांनी सर्व संचालकांचे आभार मानले आणि संस्थेच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांना आमदार अनिलदादा पाटील, किशोर आण्णा पाटील, शिवाजी चौधरी, प्रवीण चौधरी, प्रदीप चौधरी यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभणार आहे.गावकऱ्यांनी या निवडीचे स्वागत करत अभिनंदन व्यक्त केले आहे.

_DSC9920

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!