“रन फॉर अमळनेर”: १८०० हून अधिक स्पर्धकांचा राज्यस्तरीय मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग

अपनी भाषा में पढ़े! Translate

“रन फॉर अमळनेर”: १८०० हून अधिक स्पर्धकांचा राज्यस्तरीय मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर : विक्की जाधव

शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित “रन फॉर अमळनेर” या राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल १८०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवून अमळनेरकरांच्या आरोग्य-जागरुकतेची जाणीव करून दिली.

२६ जुलै रोजी आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर झाले. विशेष म्हणजे, आमदार पाटील यांनी स्वतः स्पर्धकांसोबत धावत त्यांचा उत्साह दुणावला. जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप आणि अमळनेर तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली.

७ किमी अंतराच्या या मॅरेथॉनमध्ये—

प्रथम क्रमांक: कमलाकर लक्ष्मण देशमुख (पेठ सुरगाणा, नाशिक) – ₹२१,०००

द्वितीय क्रमांक: रोहित शिवाजी बिन्नर – ₹११,०००

तृतीय क्रमांक: जयेश पाटील – ₹७,०००

उत्तेजनार्थ: दाजी तुकाराम हुबाले व ऋषीकेश विठोबा वावरे – प्रत्येकी ₹३,०००

बक्षिसांचे वितरण आमदार अनिल पाटील, ॲड. ललिता पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच ॲड. ललिता पाटील यांनी शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. या यशस्वी स्पर्धेसाठी आयोजक संस्थांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पराग पाटील यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!