अमळनेर : द्रौ.रा. कन्या शाळेचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर : द्रौ.रा. कन्या शाळेचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

 

अमळनेर : विक्की जाधव

खान्देश शिक्षण मंडळ संचलित द्रौ.रा. कन्या शाळेचा ८१ वा वर्धापन दिन व सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली.

उद्घाटनाचे औचित्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या अधिष्ठाता व माजी विद्यार्थिनी डॉ. पूर्वा रंगराव पाटील, यवतमाळच्या चीफ मॅजेस्ट्रेट अर्चना मोहन शहा आणि शाळेचे आश्रयदाते भांडारकर परिवारातील विवेकानंद, विनोद व हेमंत भांडारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फुगे सोडून करण्यात आले. मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी यांनी शाळेचा अहवाल सादर केला.

सत्कार समारंभात माजी विद्यार्थिनी, गुणवंत विद्यार्थिनी व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शाळेचे हस्तलिखित ‘फुलवात’ याचे प्रकाशन झाले. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आभासी जगापासून दूर राहण्याचा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा व आरोग्य चांगले ठेवण्याचा सल्ला दिला. अध्यक्षा डॉ. पूर्वा पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले,“सोशल मीडिया वापरण्याऐवजी सोशल व्हा, इंटरनेटचा वापर वैज्ञानिक माहितीसाठी करा आणि शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या आणि स्वतःची काळजी घ्या.” तसेच त्यांनी शाळेसाठी दीड लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कार्यक्रमात रोटरी क्लबतर्फे शैक्षणिक अॅप भेट, 1883 च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनींकडून ५५ इंची अँड्रॉइड LCD व रॅलीसाठी साऊंड सिस्टीम, तर माजी विद्यार्थिनी सुरेखा वैष्णव (1987 बॅच) यांनी ५५ पुस्तक संच शाळेला भेट दिले.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरलेले कलाशिक्षक डी. एन. पालवे यांनी साकारलेला लोगो आणि द्रौपदीबाई रामचंद्रशेठ भंडारकर यांचे रेखाटलेले चित्र होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविका वाल्हे, पाहुण्यांचा परिचय गार्गी जोशी, हस्तलिखित प्रकाशन श्रावणी मोरे व आभारप्रदर्शन रिचल पाटील यांनी केले. शेवटी उपस्थित विद्यार्थिनींना जेवण देण्यात आले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!