बोगस शिक्षक भरतीवर गदा – नियुक्तीचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड अनिवार्य

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोगस शिक्षक भरतीवर गदा – नियुक्तीचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड अनिवार्

 

मुंबई : मार्मिक न्यूज नेटवर्क

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत होणाऱ्या अनियमितता आणि बनावट नियुक्त्यांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता पुढील काळात नवीन नियुक्त होणाऱ्या सर्व शिक्षकांना त्यांची सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य राहणार आहे.

या निर्णयामुळे कागदपत्रांची पडताळणी डिजिटल पद्धतीने होणार असून कोणतीही खोटी माहिती किंवा बनावट प्रमाणपत्र सादर करणे कठीण होणार आहे. त्यामुळे बोगस भरतीला आळा बसेल आणि पात्र उमेदवारांनाच संधी मिळेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ऑनलाईन पोर्टलवर शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता, जातप्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, अनुभव पत्र, तसेच इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या प्रक्रियेत एकदा सिस्टीमवर नोंदणी झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे फेरबदल करता येणार नाहीत. शिक्षण खात्याच्या मते, या उपक्रमामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक होणार असून ग्रामीण भागातील उमेदवारांनाही सहज नोंदणी करता येईल. जिल्हास्तरावर तांत्रिक सहाय्यक नेमून ऑनलाईन अपलोडिंगसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!