अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुक्याची मासिक बैठक यशस्वीपणे पार पडली …

अपनी भाषा में पढ़े! Translate

अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुक्याची मासिक बैठक यशस्वीपणे पार पडली …

बारामती(प्रतिनिधी – वर्षा चव्हाण)

बारामती, ता. २५ जुलै २०२५ — अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची बारामती तालुक्याची मासिक बैठक गुरुवार, दिनांक 24जुलै  2025 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे पार पडली. ही बैठक पुणे जिल्हाध्यक्ष श्री तुषार झेंडे पाटील आणि सहसंघटक श्री दिलावर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत तालुक्यातील वाहतूक व्यवस्था, अवैध वाहतूक आणि पार्किंगच्या समस्या याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्री सुरेंद्र निकम यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्थानिक समस्यांबाबत ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली. तसेच, तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन घेण्यात आले.

या बैठकीस बारामती तालुका अध्यक्ष श्री संजीव बोराटे, महिला अध्यक्ष सौ. मंजुश्री तावरे, उपाध्यक्ष श्री प्रशांत जगताप, सचिव श्री महेश पवार, कोषाध्यक्ष श्री नानासाहेब तावरे, सहसचिव श्री युवराज इंदलकर, सहकोषाध्यक्ष श्री सचिन चौधर आणि सदस्य सौ. वर्षा चव्हाण, श्री बाबासाहेब शिंदे, श्री अमोल सोनवणे, श्री विकास लोहार, श्री निखिल नाटकर, श्री धनंजय तावरे, श्री सौरभ शेजवळ, श्री प्रशांत मोहीते, श्री नागेश देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत उपस्थित सदस्यांनी तालुक्याच्या प्रगतीसाठी सकारात्मक विचार मांडून कार्यपद्धती ठरवली. बैठकीचा समारोप सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शांततामय वातावरणात झाला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!