अमळनेर धावणार – अ‍ॅड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर धावणार – अ‍ॅड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा!

 

अमळनेर : विक्की जाधव 

जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप आणि अमळनेर तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी राज्यस्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा – “रन फॉर अमळनेर” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे औचित्य अ‍ॅड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधण्यात आले आहे. स्पर्धेला २६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता बाजार समितीच्या आवारातून सुरुवात होणार असून, धुळे रस्त्यावर मंगरूळ शिवार ते परत बाजार समिती असा एकूण ७ किमीचा मॅरेथॉन मार्ग असणार आहे.

या स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत –

🏆 प्रथम क्रमांक – ₹२१,००० व सुवर्ण पदक

🥈 द्वितीय क्रमांक – ₹११,००० व रौप्य पदक

🥉 तृतीय क्रमांक – ₹७,००० व कांस्य पदक

✨ उत्तेजनार्थ बक्षीस – ₹३,०००

प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या उपक्रमात राज्यभरातून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांतर्फे करण्यात आले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!