अमळनेर: वैजनताबेन भोई यांची निर्घृण हत्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल
अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला असून, वैजनताबेन भगवानभाई भोई (वय ५०, रा. वाल्मीक नगर, सुरत, गुजरात) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र तपासाचा फलक फिरत अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अनिल गोविंद संधानशिव (रा. अमळनेर) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी आढळून आलेले पुरावे, मोबाईल कॉल डिटेल्स, तसेच मृत्यूपूर्व संवादाच्या नोंदींच्या आधारे पोलिसांनी आरोपी ला तात्काळ ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने अमळनेर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मा.अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, मा.अपर पोलीस अधीक्षक अशोक नवले व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी दिलेल्या सुचनांनुसार व तांत्रिक विश्लेषणानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोनि संजीव पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल, पोलीस उपनिरीक्षक समाधान गावकवाड, पोलीस उपनिरीक्षक नामदेव पोळकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव शंकर शिंदे, पाटील व फौजदार यांच्यासोबत नेमून मिळून आरोपीस गुन्ह्यातील गोविंद संधानशिव यांना ठाणे हद्दीतून अटक करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहोत.